मराठी भाषा दिवस

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

त्याच प्रमाणे आर्य विद्या मंदिर जुहु येथेही आम्ही मराठी दिवस दरवर्षी साजरा करतो. ह्यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी प्राथमिक विभागाच्या वर्गांनी मराठी रंगारंग कार्यक्रम सादर केला. पहिलीच्या मुलांची बडबड गीते खूप लोभस होती, दुसरीची मुले ससे व फुलपाखरू बनून बागडली तर तिसरीच्या मुलांनी एकपात्री नाट्य ‘समाजसेवक’ प्रस्तुत केले. ‘झाडे वाचवा’ हे कठपुतली नाटक एक सुंदर संदेश देऊन गेले. नऊ वर्षीय सीमांत काळे गायला ‘शूरआम्हीसरदार..’, ह्या पोवाड्याने रोमांचक वातावरण निर्माण केले. तिसरीच्या मुलांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या जोशिल्या गाण्याने मराठी भाषेला मनाचा मुजरा करून सर्वांचे मन जिंकले. चौथीच्या मुलांचा कोळी नाच सर्वस्तुत्य ठरला.

प्रधानाचार्या सौ अलका अग्रवाल यांनीराज्यभाषेचे महत्व मुलांना समजावून दिले. त्याच प्रमाणे पुढील शैक्षणिकसत्र पासून मराठी विषयाचा पाचवी पासून समावेश होणार असल्याची खुशखबर दिली!